जनशक्ति प्रकाशने/Janashakti Publications

janashaktiजागतिकीकरण, धर्मांधता, जातपातवाद अशा आव्हानाचा पार्श्वभूमीवर आज वैचारिक संघर्षाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय या मूल्यांचा समाजात व्यापक प्रसार होण्याची नितांत गरज आहे.

अंधश्रद्धा व जीर्णमतवादाचा अंधार दूर करण्यासाठी शास्त्रशुद्ध विचारांचा आणि वैज्ञानिक द्रीष्टीकोनाचा प्रकाश जननेत पसरविण्याची निकड आहे. प्रागतिक साहित्य आणि जनवादी संस्कृतीची पाळेमुळे जनतेत रूजविण्याची आवश्यकता आहे. ही उद्दिष्टे समोर ठेवून २००४ साली “जनशक्ति प्रकाशन” ही संस्था आम्ही स्थापन केली आहे.

अध्यक्ष: डॉ अशोक ढवळे

संचालक: डॉ विठल मोरे

“जनशक्ति प्रकाशना” ने पुढील पुस्तके प्रकाशित केली आहेत:

चार्वाक ते मार्क्स: प्रभाकर संझगिरी

भारताचा स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर भारत: बी. टी. रणदिवे

मार्क्सवाद परिचय माला: शिव वर्मा

खरा कम्युनिस्ट कसे बनावे?: लिऊ शाओची

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – क्रांतीच्या दिशेने आगेकूच (दोन आवृत्या): डॉ विठल मोरे

शहीद भगत सिंग – आठवणी, विवेचन आणि विचार (दोन आवृत्या): संपादक डॉ अशोक ढवळे/डॉ रमेशचंद्र पाटकर

स्मरणचित्रे – क्रांतिकारी शहिदांची: शिव वर्मा (अनुवाद: चित्रा बेडेकर)

आदिवासींची एकच ललकार – जमीन जंगलावर अधिकार: कुमार शिराळकर

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि डाव्या पक्षांचे योगदान: कृष्णा खोपकर

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र – सुवर्ण कोणाच्या खिशात: डॉ सुलभा ब्रह्मे

शिकवण भीमाची (भीम क्रांती गीते): डॉ आदिनाथ इंगोले

चुली पेट्ल्यात नाहीत (कविता संग्रह): सुभाष बोड्डेवार

शिक्षणाचे बाजारीकरण – स्वरूप आणि समस्या: संपादक, रामसागर पांडे

शहीद भगत सिंह – एक मृत्युंजयी क्रांतिकारक: डॉ अशोक ढवळे

फिडेल नावाचा माणूस – फिलिप पेरेझ रोक (अनुवाद: डॉ अमित देशमुख)